जय जय भवानी, मनरमणी, माता पुरवासिनी चवंदा भुवनांची , स्वामिनी, महिषासूर मर्दिनी जय जय भवानी।
नैसुनी पाटाउ पिवळा, हार शोभे गळा हाती घेउनिया त्रिशूळा, भाळी कुमकुम टिळा, जय जय भवानी।
अंगी लयुनिया काचोळी, वर मोत्यांची जाळी,ह्रुदयी शोभतसे पदकमली। कंठी हे गरसोळी, जय जय भवानी।
पायी घांगरीया रुण झुन, नाकी मुक्ताफाळ।माथा केश हे कुरळ नयनी हे काजळ । जय जय भवानी।
सिंहावरी तू बैसुनी, मारिती दानवगण। तुजला विनवितो निशी दिन गोसावी नंदन। जय जय भवानी।
जय जय भवानी, मनरमणी, माता पुरवासिनी चवंदा भुवनांची , स्वामिनी, महिषासूर मर्दिनी जय जय भवानी।